If there are any errors in the script or the narration, please send a note to contact@seva.gurukula.com
एक होतं गाव. त्या गावात एक कंजूस माणूस राहत असे. तो कधीच कुणाला काहीच देत नसे. तो एकदा दुसऱ्या गावी जायला निघाला. जाताना वाटेत एक नदी होती. तिथे एक नाव होती. एक नावाडी देखील होता. तो कंजूस माणूस त्या नावेत बसला. नावाड्याबरोबर पलीकडे जाऊ लागला.
काही वेळातच मुसळधार पाऊस पडायला लागला. जोराने वारे वाहू लागले. नाव डगमगू लागली. कंजूस माणूस घाबरला आणि तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नव्हते. तो जोरजोरात ओरडू लागला, "वाचवा, वाचवा!” नावाडी त्याला म्हणाला, "तुझा हात दे पटकन."
पण त्या कंजूस माणसाला कधीच कुणाला काही द्यायची सवय नव्हती. त्यामुळे तो हात द्यायला काही तयार होईना! नावाड्याने विचार केला, "कसला मूर्ख माणूस आहे हा!"
तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. तो म्हणाला, "तू तरी माझा हात घे!!" आता मात्र त्या कंजूस माणसाने लगेच नावाड्याचा हात धरला आणि तो नावेत परत चढला.
काय मग मुलांनो! नावाड्याची ही युक्ती आली का तुमच्या लक्षात?