सरल कथा
Language

 

If there are any errors in the script or the narration, please send a note to contact@seva.gurukula.com

 

एक होता कावळा. प्रचंड उन्हाळ्याचे दिवस होते. कावळ्याला खूप तहान लागली होती. त्याला पाणी प्यायचं होतं. त्याने जवळपास बघितलं तर पाणी नव्हतं लांब पर्यंत बघितलं तरी पाणी नव्हतं. त्याने खूप खूप शोधलं. पण त्याला कुठेच पाणी नाही मिळालं.

 

तो खूप दूरपर्यंत बराचवेळ उडत राहिला. शेवटी त्याला एक घडा दिसला. त्याला खूप आनंद झाला. तो आशेने उडत घड्याजवळ गेला. पण त्या घड्यात खूपच थोडं पाणी होतं. तो पाण्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. तो विचारात पडला, हे पाणी मी कसं पिऊ?

 

इतक्यात त्या हुशार कावळ्याला एक युक्ती सुचली. घड्याजवळ काही दगड पडले होते.

 

त्याने एक दगड उचलल आणि त्या घड्यात टाकला. त्याने अजून एक दगड उचलला आणि घड्यात टाकला.त्याने असे पुन्हा पुन्हा केले. त्यामुळे पाणी हळूहळू वरती आले. कावळा आनंदाने ते पाणी प्यायला आणि लांब उडून गेला.

 

कित्ती हुशार कावळा होता तो. हो ना?